इतिहासात प्रथमच सोने-चांदीने ओलांडला ‘हा’ टप्पा ; काय आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव?

डिसेंबर 5, 2023 11:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । दिवाळीपासून सुरु असलेली सोने आणि चांदीच्या किंमतींमधील वाढीला मोठा ब्रेक लागलेला नाही. उलट किंमती सातत्याने वाढत आहे. या दोन आठवड्यात किंमतींनी सलग दरवाढीची सलामी ठोकली आहे. याच दरम्यान सोन्यासह चांदीच्या किमतीने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहे. इतिहासात प्रथमच चांदीने जीएसटीसह 80 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याच्या किमतीने जीएसटीसह 66 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. Gold Silver Rate 5 December 2023

gold 1 jpg webp

जळगावमधील सोने चांदीचा दर
देशभरात सध्या लग्नसराईचे सुरु असून मात्र याच दरम्यान, सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडच पाणी पळाले आहे. गेल्या आठवड्यातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर जीएसटीसह 66,300 रुपयावर पोहोचला आहे. तर विनाजीएसटी 64,300 इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर जीएसटीसह 80,350 रुपयापर्यंत आहे.

सोमवारी रविवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 529 रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी चांदीचे प्रती किलोचे दर शनिवारी 79825 होते. त्यात 515 रुपयांची वाढ होवून ते तीन टक्के जीएसटीसह 80,350 रुपये किलोवर पोहोचले.

MCX वर सोन्या-चांदीच्या किमती
तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याची किंमत 0.44 टक्के म्हणजेच 273 रुपयांच्या वाढीनंतर प्रति किलो 62,642 रुपये आहे. तर चांदी 0.12 टक्क्यांनी म्हणजेच 92 रुपयांच्या वाढीसह 76,260 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now