एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर ; धावत्या बसचे चाकं निखळले, अन्..
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२३ । राज्याच्या एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एसटी बसचे मागचे चाकं निखळल्याची घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उळे-कासेगाव घडली. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून येथून ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने हा अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले.
मात्र, ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच एसटी बस पलटी झाली. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.