⁠ 
शनिवार, मे 18, 2024

राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२३ । राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली असून शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केल्यामुळे त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिेच्या रोड डिपार्टमेंटच्या तक्रारीनंतर एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे. या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते तसेच पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री परेल येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.