वाणिज्य

ऐन सणासुदीच्या तोंडावर दिवाळीचा फराळ कडू कडणारी बातमी ; जीवनावश्यक वस्तू महागल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२३ । दिवाळी सारखा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून यासाठी फराळ तयार करण्याची लगबग सुरु आहे. मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर दिवाळीचा फराळ कडू कडणारी बातमी आली आहे. ऐन दिवाळीच्या सणात मैदा, बेसन, पोहे, रवा, गुळ, साखर, खोबऱ्यासह तुरडाळ आणि कडधान्याचे भाव कडाडले आहेत. याबाबतची एक बातमी राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाजमाध्यमावर ट्वीट केली आहे. किरकोळ बाजारात सर्व जीवनावश्यक वस्तू 35 ते 40 टक्के महागल्याने सर्वसामान्य गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.

खरंतर फराळाच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड महागले आहेत. गेल्या दोन महिन्यांनी तुरडाळ आणि इतर डाळींचे भाव प्रचंड वाढले आहेत. फराळासाठी लागणारे साहित्य महागल्याने लोक रेडीमोड फराळाकडे ग्राहक वळत असतात. रेडीमेड फराळाचे दर गेल्या वर्षांच्या तुलनेत किलोमागे 100 ते 120 रुपयांनी महागले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ किरकोळ बाजारात 130 रुपये किलो होती. आज ती 180 ते 190 रुपये किलो आहे. चणाडाळ दोन महिन्यांपूर्वी 70 रुपये किलो होती, आज ती 100 रुपये किलो आहे. मुगडाळ दोन महिन्यांपूर्वी 90 रुपये होती आज ती 130 रुपये किलो होती. बेसन दोन महिन्यांपूर्वी 80 रुपये किलो होते, आता बेसनचा दर 120 रुपये किलो आहे. मैदा पूर्वी 40 रुपये किलो होता आज 60 रुपये किलो झाला आहे.

दोन महिन्यापूर्वी आणि आजचे दर खालीलप्रमाणे
तूरडाळ – पूर्वी 130 रु. – आता 180 ते 190 रु. किलो
चणाडाळ – पूर्वी 70 रु. – आता 85 ते 100 रु. किलो
मुगदाळ – पूर्वी 90 रु. – आता 125 ते 130 रु. किलो
बेसन – पूर्वी 80 रु. – आता – 100 ते 120 रु. किलो
मैदा – पूर्वी 40 रु. – आता – 50 ते 60 रू. किलो

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button