ग्राहकांसाठी शुभवार्ता ! चांदी १४०० रुपयांनी घसरली, सोनेही ३०० रुपयाने झाले स्वस्त..

नोव्हेंबर 2, 2023 9:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । दिवाळीपूर्वी सोने-चांदी स्वस्ताईचा अंदाज व्यक्त होत असताना इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धाने सर्व समीकरणं बिघडवली. गेल्या महिन्यात सोने-चांदीने (Gold Silver Rate) 4 हजारांची उसळी घेतली होती. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्यासह चांदीचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून होते. मात्र सोमवार, मंगळवार आणि बुधवारी असे सलग तीन दिवस सोने-चांदीत जोरदार घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. Gold Silver Rate 2 November 2023

gold 1 jpg webp

जळगाव सुवर्णनगरीत बुधवार, १ रोजी चांदीच्या भावात तब्बल एक हजार ४०० रुपयांनी घसरण दिसून आली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी ७१ हजार ६०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात काल बुधवारी ३०० रुपयांची घसरण होऊन ते विनाजीएसटी ६१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.दिवाळीपूर्वी जर भाव अजून कमी झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

मागील गेल्या चार दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यांनतर आता ६१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ७३ हजार ५०० रुपयांवर गेलेल्या चांदीच्या भावात २६ ऑक्टोबर रोजी एक हजार रुपयांची घसरण झाली.

३१ रोजी पुन्हा ७३ हजारावर पोहोचली. दुसऱ्याच दिवशी १ नोव्हेंबर एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली व चांदी ७१ हजार ६०० रुपये प्रति किलोवर आली आहे. सट्टाबाजारातील खरेदी-विक्रीमुळे हे भाव कमी जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now