⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | बसला ओव्हरटेक करायला गेला अन् जीव गमावून बसला ; दुचाकीस्वार तरुण ठार

बसला ओव्हरटेक करायला गेला अन् जीव गमावून बसला ; दुचाकीस्वार तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२३ । अपघाताचे प्रमाण कमी होता होत नाहीय. दिवसेंदिवस यात वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागतोय अशातच बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी बसच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयासमोर घडली. या अपघात दुचाकीवरील सोबत असलेला एक जण थोडक्यात बचावला आहे.किसन ऊर्फ कृष्णा तलवारे (वय ३४, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर, ह.मु. इच्छापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातून गेलेल्या छत्रपती संभाजीनगर ते बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर हा भीषण अपघात झाला.यावेळी अवजड वाहतूक करणारा ट्रक हा रस्त्यात मध्येच बेशिस्तीने उभा होता. दरम्यान, याच काळात मागून येणाऱ्या बसला (क्रमांक एमएच १० डीएल ३५५५) ओव्हरटेक करताना दुचाकीने किसन तलवारे व सोबत तुळशीराम वानखेडे हे दोघेजण येथून जात होते.

त्यावेळी अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी बसच्या चाकाखाली आल्याने किसन तलवारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला तुळशीराम वानखेडे थोडक्यात सुदैवाने बचावला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.