जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३। ए. टी झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे श्रावण मासा निमित्त श्रावण सरी (पाऊस गाणी) गीत-गायनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी के. सी. ई. सोसायटी) व प्रा. देवेंद्र गुरव (स्वरदा संगीत विभाग एम. जे. महाविद्यालय, जळगाव) लाभले. व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे व गुरुवर्य प वि पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता फालक उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘बरसो रे मेघा मेघा’, ‘हिरवा निसर्ग’, श्रावण आला’, श्रावण मासी, मन उधाण वाऱ्याचे, चिंभ भिजलेले इत्यादी गिते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत शिक्षक श्री रितेश भोई यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पराग राणे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम समिती व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.