⁠ 
गुरूवार, मे 16, 2024

ऑन ड्युटी जुगार खेळणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचा दंड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३| ऑन ड्युटी जुगार खेळणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. त्याप्रकरणी प्रशासनाने चौघांवरही कारवाई केली आहे. अतिक्रमण निर्मूलनाचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी ऑन ड्युटी जुगार खेळणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी केली आहे.

दंडाची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे. तसेच जुलै २०२३ चे वेतनवाढ ही ऑगस्टच्या वेतनापासून पुढे सहा महिन्यांसाठी गोठवण्यात येणार आहे, असे उपायुक्त यांच्या आदेशात म्हटले आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी संजय पाटील, नितीन भालेराव, ज्ञानेश्वर कोळी, सतीश ठाकरे हे ऑन ड्युटी जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. या प्रकाराची दखल घेऊन उपायुक्तांनी चौघांना कारणे दाखवा बजावून खुलासा मागवला होता. मात्र खुलासा योग्य नसल्याने दंड करण्यात आला.