जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२३ । गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी (Gold Silver Rate) घसरण सुरु होती. मात्र श्रावणात पहिल्या सोमवारी दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ झाली. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यातील दरवाढीची बरोबरी अजूनही सोन्याला करता आलेली नाही. ऐन सणासुदीत किंमती वधारतील, असा काहींचा कयास आहे. सध्या सोन्याचा दर दोन महिन्याच्या नीच्चांकीवर आला आहे. Gold Silver Rate Today

दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने स्थिर तर चांदी किंचित घसरलेली दिसून येत आहे. आज मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे)चा दर स्थिर असून 58,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे भाव 50 रुपयांनी घसरून 71,612 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा दर 59 हजाराखाली गेला आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 53800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,800 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 71,300 रुपये इतका आहे.












