⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

स्वस्तात खरेदीची संधी ; सोने 1500 रुपयांपर्यंत, तर चांदी 6000 रुपयांनी घसरली..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । सोने आणि चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणाऱ्यांसाठी स्वस्तात खरेदीची संधी आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किंमती घसरल्याने भारतीय सराफा बाजारात खरेदीदारांनी एकच गर्दी केली आहे. भारतात अजूनही किंमती मे-जून महिन्यात इतपत घसरलेल्या नाहीत. जुलै महिन्यातील दरवाढीचे पाठबळ सोन्याला आहे. सध्या सोन्याचा दर 58 हजाराच्या घरात असून चांदीचा दर 70 हजारावर आला आहे. सोन्याचा दर गेल्या दोन महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले आहे.

सोने-चांदीत झाली तब्बल इतकी घसरण?
गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्यात पुन्हा पडझड झाली. भावात जवळपास 550 रुपयांची घसरण झाली. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली. 17 ऑगस्ट रोजी सोन्यात मोठी घसरण झाली. किंमती 350 रुपयांनी घसरल्या. या महिन्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली आहे.तर दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात चांदीच्या किमतीत देखील मोठी पडझड झाली आहे. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. 

दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत सुरुवातीलाच वाढ झालेली दिसून आलीय. आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे)चा दर 110 रुपयांनी वाढून 58,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे भाव 440 रुपयांनी वाढून 70,440 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा दर 59 हजाराखाली गेला आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 53700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,800 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 70,300 रुपये इतका आहे.