ग्राहकांनो अशी संधी पुन्हा नाही! सोने-चांदीच्या किमतीची घसरगुंडी, नवे दर तापासून घ्या..

ऑगस्ट 14, 2023 10:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीला सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. यामुळे सोन्याचा दर 59 हजाराखाली आला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 70 हजाराखाली आला आहे. Gold Silver Rate Today

gold jpg webp

एप्रिल महिन्यात झालेल्या वाढीनंतर मे आणि जून मध्ये सोन्याचा दर घसरून 58 हजाराच्या घरात आला होता. तर चांदीचा दर देखील 70 हजाराखाली आला होता. मात्र जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. सोन्याच्या भावाने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. तर चांदीने 77000 रुपयापर्यंतची मजल मारली होती. पण ऑगस्ट महिन्यात सोन्याला मोठी झेप घेता आली नाही.मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंचे दर घसरत असता दिसत आहे.

MCX काय आहे आजचा दर काय?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोमवारी बाजाराच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झालेली दिसतेय. MCX वर आज सकाळी 10 वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) किंचित घसरून 58,888 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे भाव 133 रुपयांनी घसरून 69,843 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव या आठवड्यात 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली घसरला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 59,298 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. गेल्या महिन्यापासून सोन्याच्या दरात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,300 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 70500 रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now