Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा, जूननंतर पहिल्यांदाच किमती..

ऑगस्ट 11, 2023 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२३ । सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना पुन्हा दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या (Gold Rate) दरात घसरण सुरूच असून चांदीही (Silver Rate) स्वस्त झाली आहे. जागतिक बाजारात कमजोरीची चिन्हे असताना भारतीय सराफा बाजारातही सोने-चांदी स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झालेली दिसतेय.

gold silver 1 jpg webp

आज सकाळी बाजार उघडताच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी लाल चिन्हाने व्यवहार करत आहे. विशेष जून नंतर सोन्याचा दर 59 हजाराखाली आला आहे. दुसरीकडे चांदीचा दरही 70 हजाराखाली आला आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

MCX काय आहे आजचा दर काय?
MCX वर आज सकाळी 10 वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) किंचित 78 रुपयांनी घसरून 58,775 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे भाव 103 रुपयांनी घसरून 69,878 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, जुलै महिन्यानंतर पहिल्यांदा भाव 60,000 रुपयांच्या आत आले आहे. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीच्या किंमती घसरण झाली होती. सोन्याचा भाव 58,000 रुपयांच्या घरात आला होता. तर चांदीचा दर 69 हजाराच्या घरात होता. मात्र जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. सोन्याच्या भावाने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. तर चांदीने 77000 रुपयापर्यंतची मजल मारली होती. पण ऑगस्ट महिन्यात सोन्याला मोठी झेप घेता आली नाही. गेल्या मागील काही दिवसात सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,300 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 60,500 रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now