‘गदर 2’ ची छप्परफाड कमाई ; पहिल्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला..

ऑगस्ट 12, 2023 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । तब्बल २२ वर्षांनंतर बहुचर्चित ‘गदर २’ सिक्वेल प्रदर्शित झाला आहे. ‘गदर २’ सिनेमाला अधिक पसंती मिळाली आहे. आता या चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले असून त्यानुसार ‘गदर 2’ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस छप्परफाड कमाई केली आहे.

gadar 2 jpg webp

सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) स्टारर ‘गदर 2’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Opning Day) चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, ‘गदर 2’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 35 कोटींची कमाई केली आहे. 

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. 

दरम्यान, गदर 2 सह अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘ओएमजी 2’ (OMG 2) हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. मात्र दोन्ही सिनेमांचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कमाईच्या बाबतीत ‘गदर 2’ने चांगली कमाई केली आहे. ‘ओएमजी 2’ने ओपनिंग डेला फक्त 10 कोटींची कमाई केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now