जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। मनी लॉंड्रींग प्रकरणी कारागृहात असणारे माजी मंत्री नवाब मलिक यांना आज न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्याने त्यांना अल्प दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडीत मंत्री असणारे नवाब मलीक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांना मनी लॉंड्रींग प्रकरणी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहातच होते. त्यांनी अनेकदा जामीनासाठी अर्ज केला असला तरी तो फेटाळण्यात आला होता. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यात झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.
नवाब मलीक हे कारागृहात असतांनाच राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीच्या जामी महायुतीची सत्ता आली होती. तर मध्यंतरी राष्ट्रवादीतील अजितदादा पवारांचा गट देखील सत्तेत सहभागी झाला. आता मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन मिळाल्याने त्यांना अल्प का असेना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे