जळगाव-प्रतिनिधी : ८ ऑगस्ट २०२३ : हाफ मॅरेथॉन अर्थात २१ किलोमीटरचे अंतर धावण्यासाठी प्रचंड शारिरीक फिटनेस व दररोजचा सराव आवश्यक असतो. तरिही क्वचितच लोक हाफ मॅरेथॉन पूर्ण करतात. मात्र ओम योगा ग्रुप व जळगाव रनर्स ग्रृपचे सदस्य भारत पहवानी व होरिलसिंग राजपूत यांनी ९९ हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. येत्या २० ऑगस्ट रोजी १०० व्या हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. या १००व्या हाफ मॅरेथॉनची ओम योगा ग्रुप आणि जळगाव रनर्स गृपतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भारत पहवानी यांचे दाणा बाजारात दुकान आहे तर होरिलसिंग राजपूत यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दोन्ही जण २०१७ मध्ये जेंव्हा जळगाव रनर्स गृपची पहिली खान्देश रन झाली तेंव्हापासून धावण्याच्या अनेक स्पर्धांशी जुळलेले आहेत. १८ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पहिली हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. तेंव्हा पासून ते लगातार या स्पर्धेत भाग घेत असून आतापर्यंत त्यांनी तब्बल ९८ हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. येत्या रविवारी अर्थात १३ ऑगस्टला ते ९९व्या हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. तर २० ऑगस्ट रोजी ते त्यांच्या १०० व्या हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.
धावण्यासाठी शारिरीक फिटनेसची आवश्यकता असते, यासाठी आम्ही नियमितपणे रोज योगा करतो तसेच दर बुधवारी १० किमी धावतो, असे त्यांनी सांगितले. ओम योगा ग्रुप आणि जळगाव रनर्स गृपतर्फे या हाफ मॅरेथॉनची विशेष तयारी केली आहे. दोन्ही रनर्सला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासोबत ओम योगा ग्रुप आणि जळगाव रनर्स गृपचे १५० ते २०० सदस्य देखील त्यांचा सोबत १००व्या हाफ मॅरेथॉन मधे धावणार आहेत विशेष म्हणजे महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
हाफ मॅरेथॉन २१ किमीची का असते?
मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी असते तर हाफ मॅरेथॉन २१ किमीची असते. या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची क्षमता बनवणे आवश्यक असते. दररोज सराव करणं आवश्यक असतं. तसेच त्यात वेग नेमका ठेवून शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. यासाठी फिटनेस हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.
मॅरेथॉनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक लढाई झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५ किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव ‘मॅरॅथॉन’ हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले.