⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मोठी बातमी! अमळनेर शहरात संचारबंदी लागू, काय आहे कारण?घ्या जाणून

मोठी बातमी! अमळनेर शहरात संचारबंदी लागू, काय आहे कारण?घ्या जाणून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२३ । अमळनेरातून एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे अमळनेर शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. काल रात्री अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात प्रशासनाने कलम-१४४ लावले आहे.

दि,9.06.2023 रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजारासह परिसराद दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वातावरण नियंत्रणात आले.

पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू होती. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण पण पूर्णपणे नियंत्रणात आहे.

दरम्यान, शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात दि.10.6.2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते 12.06.203 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत आली आहे. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करणेत्त येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.