अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानाला आग ; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

मे 22, 2025 5:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । अमळनेर नगरपरिषदेसमोर असलेल्या दुकानांना आग लागल्याची घटना आज २२ मे रोजी घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी टळली असून, अधिक तपास सुरू आहे.

fire 11 jpg webp

याबाबत असे की, अमळनेर नगरपरिषदेसमोर असलेल्या दुकानांना अचानक आग लागली. दरम्यान दुकाने बंद असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शटर तोडावे लागले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थोडा वेळ लागला. या आगीत दुकानांमधील कटलरीचे साहित्य, पाण्याचे जार, फरसाण आणि इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, शॉर्ट सर्किट हेच आगीचे प्राथमिक कारण असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment