Amalner : लाडकी बहिणींचे पैसे काढण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला फूस लावून लुटले

मे 23, 2025 5:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । एकीकडे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होत नसताना त्यातच अमळनेर येथून दाम्पत्याला फसविल्याची घटना समोर आली. ज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला फूस लावून बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे सांगत तहसील कार्यालयात घेऊन गेला. मात्र कार्यालयाबाहेर अंगावरील दागिने काढून घ्या असे सांगत या दाम्पत्याकडील ४५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे. याबाबत अशरफबी शेख यांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल करत गुन्हा दाखल झाला.

crime 2 jpg webp

अमळनेर तहसील कार्यालयाच्या बाहेर सदरची घटना घडली आहे. सदर घटनेत अशरफबी फकीर मोहंमद शेख या पतीसोबत पुतणीच्या लग्नासाठी अमळनेरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभ्या असताना तेथे एक जण आला. त्याने महिलेला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देत असल्याचे सांगितले. यावर दाम्पत्याने विश्वास ठेवला.

रिक्षातून नेले तहसील कार्यालयात
यानंतर रिक्षामध्ये बसवून त्यांना तहसील कार्यालयात घेऊन गेला. येथे पोह्चल्यानंतर तहसीलच्या बाहेर झाडाच्या आडोशाला घेऊन जात अंगावरील दागिने काढून घ्या, नाही तर पैसे मिळणार नाहीत’, असे त्याने सांगितले. त्यावरून महिलेने तिच्या अंगावरील १४ हजारांचे सोन्याचे टोंगल, १४ हजारांची पांचाळी, १५ हजारांचे चांदीचे वाळे व दीड हजाराचा मोबाईल पिशवीत काढून ठेवला. यानंतर फकीर शेख यांना तहसील कार्यालयात घेऊन गेला. बाहेर येत काकांचे ४० हजार रुपयांचे काम झाले असून तुम्हीही चला म्हणून सांगत महिलेला घेऊन गेला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment