जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत आल्या पासून मंत्री अब्दुल सत्तार हे वेळोवेळी वादग्रस्ते वक्तव्ये करत आहेत. ते कधी महिला खासदाराबद्दल (सुप्रिया सुळे) गरळ ओकतात तर कधी जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? प्रश्न विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे…”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा विधानसभेत समाचार घेतला.
सिल्लोडमधल्या कृषी कार्यक्रमावरुन बोलताना अजित पवार विधानसभेत कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांच्या भाषणानंतर विधानसभेत विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. गायराण जमिनीचा घोटाळा आहे. १५० कोटींचा हा घोटाळा आहे. गायराण जमीन कुणाला देता येत नाही. सरकारी जमीन हडपण्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. महसूल राज्य मंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. वाशिमला लागून असलेली ३७ एकर जमीन आहे. पदाचा दुरूपयोग करत एका व्यक्तीला फायदा मिळून दिला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी करत असताना अजित पवार कमालीचे आक्रमक झाले होते.
“शिंदे फडणवीस सत्तेत आल्यानंतर अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढली आहे. महिला खासदाराविरोधात गरळ ओकण्याचं काम करतात तर कधी जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का प्रश्न विचारतात… अशा वागण्याला काय म्हणायचं… निर्लज्जपणाचा कळस आहे हा…..”, असं अजित पवार म्हणाले. अ