⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव दूध संघासाठी काटे की टक्कर, संपूर्ण निकाल थोडयाच वेळात येणार..

जळगाव दूध संघासाठी काटे की टक्कर, संपूर्ण निकाल थोडयाच वेळात येणार..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी सुरू आहे. ५ जागांचे कौल जाहीर झाले असून सर्वसाधारण गटाची मोजणी सुरू आहे. सध्या काटे की टक्कर दिसून येत असली तरी शेतकरी पॅनलचे बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. अवघ्या अर्ध्या तासात सर्व निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानानंतर दोन्ही पॅनलनी विजयाचा दावा केला.

हे देखील वाचा : निकालापूर्वीच रोहिणी खडसेंनी सोडले मतमोजणी केंद्र

दरम्यान, या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. मतदानाच्या सुरुवातीलाच अरविंद देशमुख आणि संजय सावकारे यांनी अनुक्रमे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय संपादन करत शेतकरी विकास पॅनलचे विजयाचे खाते उघडले.

यानंतर ओबीसी प्रवर्गातून पराग वसंतराव मोरे यांनी गोपाळ भंगाळे यांचा पराभव करत सहकारचे खाते उघडले. तर महिला प्रवर्गातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली. यात सहकारच्या छायाताई गुलाबराव देवकर आणि शेतकरी विकासनच्या पूनम प्रशांत पाटील यांनी विजय संपादन केला.

हे देखील वाचा : दूध संघ निवडणुक : सुरुवातीलाच महाजनांनी दिला खडसेंना धक्का

यानंतर उत्सुकता लागून असलेल्या मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मंगेश चव्हाण यांनी निर्णायक आघाडी घेतली. तर, उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकरी पॅनल विजयाच्या मार्गावर असल्याचे कल मिळाले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.