⁠ 
सोमवार, जून 17, 2024

दूध संघ निवडणुक : सुरुवातीलाच महाजनांनी दिला खडसेंना धक्का

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज रविवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झालेली आहे. दरम्यान, सुरुवातीलाच गिरीश महाजनांनी दिला एकनाथ खडसेंना धक्का दिला आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू असलेले अरविंद देशमुख हे विजयी झाले आहे. ते 90 मतांनी विजयी झाले.

तर दुसरीकडे भुसावळ मतदार संघातील भाजपचे आमदार संजय सावकारे 76 मतांनी विजयी झाले आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीय

गेल्या काही दिवसापासून जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलेच तापले गेलं होते. यावरून आरोप-प्रत्यारोप होत होती. काल म्हणजेच शनिवारी १९ जागांसाठी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रावर ४४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा दूध संघाच्या मतदानात १०० टक्के मतदान झाले आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.