राज्यस्तरीय बारी समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

ऑक्टोबर 29, 2022 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । नागवेल प्रतिष्ठान जळगांव तर्फे बारी समाजाचा राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी गुजरात, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त उपवधू-वरांची नोंदणी झालेली असून यावेळी उपवर-वधू सूचीचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

jalgoan 41

मेळाव्यात बारी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितिन बारी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूषण बारी, शरद वराडे, अतुल बारी, योगेश बारी, योगेश येऊल, बंटी लावणे, प्रा. दिपक बारी, लतिष बारी, नरेंद्र बारी, प्रकाश रोकडे यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now