⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | सृजन १.० शिबिरात मुलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

सृजन १.० शिबिरात मुलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । बदलत्या वयातील किशोरवयीन मुलांच्या आयुष्याची जडणघडण होण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या सृजन १.० शिबिरास नुकतीच सुरुवात झाली असून विविध जिल्ह्यातील शिबिरार्थीनी आपली हजेरी लावली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे तालखेडा येथील मानवता सेवा संस्था व रुद्र वेलफेअर फाऊंडेशन नागपुर द्वारा सृजन १.० अर्थपुर्ण तारुण्याकडे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एक आगळं-वेगळं पण तितकचं महत्त्वपुर्ण असलेल्या या शिबिरात सुंदर देखावे, नीटनेटकेपणा तसेच प्रमुख महत्त्वपुर्ण विषयांवरील कृतीसह मार्गदर्शन बघुन शिबिरार्थीसह पालकवर्गही प्रफुल्लित होऊन मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पहावयास मिळाले. सुरुवातीलाच आलेल्या शिबिरार्थीं आणि त्यांच्या पालकांचे स्वागत सृजनच्या टीम ने केले. सकाळच्या सत्रात शिबिरार्थीचे तीन गट तयार करण्यात येऊन विविध वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश करण्यात आला.

रानफुले उमलली – शिबिरार्थीनी आपला परिचय एका वेगळ्या ढंगात दिला. स्वतःचे नाव गाव शाळा वर्ग सांगतानाच निसर्गाच्या कोणत्या गोष्टींसारखे ते आहेत हे सुद्धा कल्पकतेने सांगितले. पाणी, हवा, माती, ढग, दगड, गुलाब, नारळ, निशिगंध, रानफुले, फळा फुलांनी भरलेलं झाड, वाघ, सिंह, प्रशांत महासागर आदी विविध घटकांसोबत आपले तादात्म्य प्रस्थापित केले.
पहाटेची दिनचर्येसह योगासने व नाश्ता आटोपुन श्रमदानातून कौतुकास्पद वनराई बंधारा तयार केला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह