---Advertisement---

मोठी बातमी : शिंदे – फडणवीस आणि आदित्य ठाकरे जाणार शेतकऱ्याच्या बांधावर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नुकताच औरंगाबाद दौरा झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावत शेतीची पाहणी केली. आता आदित्य ठाकरे देखील शेतकरऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. यामुळे सर्व स्थरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.यातच अजून एक महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. ते आज दौरा करतील असा अंदाज आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली होती. ठाकरेंचा हा दौरा अवघ्या २४ मिनिटांत आटोपला अशीही टिका करण्यात आली. तर दुसरीकडे ठाकरेंना दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांचा आठवण आली, असे बोलण्यात आले.अशी टीका सुरु असतांनाच शिवसेना नेते आदित्य ठाकरे शेतकरऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचे आता अजून टीक होईल असे म्हटले जात आहे.

आदित्य ठाकरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. याच बरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत . २७ ऑक्टो रोजी शिंदे – फडणवीसांचा दौरा आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---