आधी समन्वय संघाची भूमिका समजून घ्या, मग..
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे दि. 10 ऑक्टोबर 2022 पासून “19 सप्टेंबर 2016 चा शासन निर्णय रद्द करून विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या शासन निर्णय अन्वये अनुदानाचे सूत्र लागू करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
” माझा पगार, माझी जबाबदारी” त्यासाठी “शेवटची मुंबई वारी” या भूमिकेखालील राज्यातील शिक्षक मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. या शिक्षकांची राहण्याची व्यवस्था नाही,मिळेल त्या जागी झोपी जाऊन शिक्षक आंदोलन करीत आहेत, मात्र अद्यापही या शिक्षकांच्या मागणींवर सकारात्मक असा कोणताही तोडगा न निघाल्यामुळे या शिक्षकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांनी आझाद मैदानातच आपली काळी दिवाळी साजरी केली, पैसेच नसल्यामुळे दिवाळी साजरी करू शकत नाही, त्यामुळे शिक्षक आजाद मैदानाला ऐन दिवाळीच्या रोजी बसून होते.
यामध्ये या शिक्षकांनी तीव्र नाराजी
आपल्या लोकप्रतिनिधींविषयी बोलून दाखवलेली आहे,शिक्षकांचे वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित असण्यासाठी शिक्षक आमदार जबाबदार आहेत, वेळोवेळी ज्या त्या समस्या कोणत्याही शासनाची जी चुकीची जी धोरण होती त्याला शिक्षक आमदारांनी कडून कठोर विरोध केला असता तर शिक्षकांच्या नशिबी विनाअनुदानाचे जगणे आलेच नसते ,काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ पडलीच नसती.मात्र सोयीच्या राजकारणासाठी हे मुद्दे लांबविण्यात आले असा आरोप शिक्षकांनी केलेला आहे.
आज रोजी या शिक्षकांचे सेवेच्या आयुष्य सेवानिवृत्तीकडे निघून गेलेले आहेत,अनेक शिक्षकांच्या खिशामध्ये दमडी नाही, प्रपंच त्यांचा चालवत असताना खूप मोठे तारेवरची कसरत होत आहेत. अनेक शिक्षकांच्या मुली लग्नाला आलेले आहेत, मात्र प्रश्न हा जसाचा तसा कायम आहे. त्यात कुठलाही प्रकारची सुधारणा होताना दिसत नसल्यामुळे या शिक्षकांनी आपल्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत.
नुकतीच समन्वय संघाने ऍड. तुकाराम शिंदे (संस्थापक अध्यक्ष,मराठा कुणबी संघटना) यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. त्यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी निधी कमी पडू देणार नाही अशी त्यांनीशिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली. शिक्षण मंत्री केसरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याच्या भूमिकेत असताना मग शिक्षक आमदार विशिष्ट मुद्द्यांचा बाबतीत पाठपुरावा का करतात ? आपली भूमिका स्पष्ट मांडत नाहीत असा आरोप शिक्षकांनी केलेला आहे. येणाऱ्या 01 नोव्हेंबर 2022 रोजी शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी, त्यासोबत राज्याचे शिक्षक पदवीधर आमदार ,माननीय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक पार पडणार आहे.
या बैठकीमध्ये 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या शासन निर्णयाचे अनुदान सूत्र लागू करण्यात यावे ही आग्रहाची मागणी शिक्षक समन्वय संघाने केलेली आहे. कारण शिक्षकाला प्रत्येक अनुदानाचा टप्पा मिळवून घेण्यासाठी वारंवार आजाद मैदानात संघर्ष करावा लागत आहेत.शाळा बंद करूनही वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागते या प्रमुख मागणीसाठी या शिक्षकांनी तब्बल आतापर्यंत साडेतीनशे पेक्षा जास्त आंदोलन केलेली आहेत.त्यामुळे या शिक्षकांच्या गंभीर अशा प्रश्नाचा तिढा सुटायला हवा. यासाठी शिक्षक आमदारांनी शिक्षकांच्या पाठीमागे उभे राहून पूर्वीप्रमाणे वेतनाचे नैसर्गिक अनुदान टप्पे लागू करण्यात आग्रहाची भूमिका ठेवावी व याकरिता बैठकीला जाण्याअगोदर आझाद मैदानात सर्व शिक्षक आमदारांनी एकत्र येऊन समन्वय संघाची भूमिका समजून घ्यावी अशी भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे.