गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला दिले पाणीपुवठ्याचे काम : आ. चिमणराव पाटील

ऑक्टोबर 22, 2022 12:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याचे कामे दिल्याने या दोघांमध्ये संघर्ष वाढला आहे. मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही असे चिमणराव पाटील म्हणाले आहेत.

chimanrao patil gulabrao patil

यावेळी बोलताना चिमणराव पाटील म्हणाले कि, एका सरकारमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते बनवण्यात प्रत्येकाचा वाटा असतो. एकेक मतावर सरकार येत आणि कोसळतं. त्यामुळ कोणी मंत्री झाला तर सरकार त्याची खासगी मालमत्ता नसते. सर्व मिळून सरकार आलेलं असतं आणि म्हणून तुम्ही मंत्री आहात याचं भान कायम ठेवलं पाहिजे.

माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना फोन केला. त्यांनी फोनवर यापुढे असं व्हायला नको असं सांगितलं. मला डावलण्याचा त्यांचा काय संबंध? ते डावलतात हे एकदम चुकीचे आहे,” असे यावेळी चिमणराव पाटील म्हणाले.

\

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now