जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । भारतीय डाक विभागातर्फे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” ९ ते१२ ऑक्टोबर”भारतीय पोस्ट सप्ताह ” साजरा करण्यात आला.या निमित्त ए.टी.झांबरे विद्यालयाच्या इ.५ वी.च्या विद्यार्थ्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस ला भेट दिली.या प्रसंगी मुख्य पोस्ट मास्तर या.एस.एम.कुलकर्णी यांचे बी.डी.झोपे यांनी व सहाय्यक पोस्ट मास्तर ललित बोरकर यांचे एस.एम.शिरसाठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी कुलकर्णी साहेबांनी पोस्ट सप्ताह चा उद्देश व त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच बोरकर यांनी भारतीय डाक विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या आधुनिक बदला संबंधी व भारतीय डाक विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमास एम.वाय. ठोसरे,व आर.एन तडवी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार ई.पी.पाचपांडे यांनी मानले.












