महावितरण विरोधात बामसेफचे पोल खोल आंदोलन

ऑक्टोबर 16, 2022 12:22 PM

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड सब स्टेशन ते कोठा सबस्टेशन पर्यंत गेलेल्या 33 के व्ही विद्युत वाहिनीच्या बोगस कामा विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे खोल खोल आंदोलन करण्यात आले.सदर काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असुन अनेक ठिकाणी पोल वाकलेले आहे.काम दर्जेदार झाले नसल्याचा आरोप होत आहे.महावितरणच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

jalgaon 2022 10 16T122219.703

बहुजन मुक्ती पार्टीचे रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, तालुका अध्यक्ष बिजलाल इंगळे, पारस हेरोळे, लहुजी क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश ढगे, उप अध्यक्ष राजू सोनवणे, मनोज पोहेकर, किरण पोहेकर, पांडुरंग पाटील, विठ्ठल पाटील, संदीप धनगर, प्रमोद भिल्ल, किरण पाटील, मनोज इंगळे, जयराज इंगळे, शुभम इंगळे, दिलीप धनगर, अनिकेत सोनवणे, अरुण जाधव, विठ्ठल कोळी आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories