अभिनंदन : महिला टीम इंडियाने सातव्यांदा आशिया चषक जिंकला

ऑक्टोबर 15, 2022 5:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । महिला आशिया चषक 2022 आज भारत आणि श्रीलंका यांच्यात निर्णायक अंतिम सामना झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय महिला संघांच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही. त्यामुळे फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळं श्रीलंकेला 20 षटकांत 9 विकेट्स गमावत फक्त 65 धावाच करता आल्या. दरम्यान, भारताला हा सामना जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं. परंतु, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या आक्रमक खेळीमुळं भारताने आशिया कप 2022 चं जेतेपद पटकावलं. मानधनाने आक्रमक खेळी करून 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर हरमनप्रीत 11 धावांवर नाबाद राहिली.

jalgaon 2022 10 15T170908.300

रेणुका सिंग ठाकूरसह यांनी चांगली गोलंदाजी केली
श्रीलंकेच्या महिला टीमच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कुचकामी ठरविला कारण 20 ओव्हरमध्ये फक्त श्रीलंका टीमला 65 धावसंख्या उभारता आली. रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी आजच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली.

स्मृति मांधनाने चाहत्याचं मनं जिंकलं.
स्मृति मांधनाने आजच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. महिला टीम इंडियाने आजच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना 8 ओव्हरमध्ये आपलं लक्ष्य गाठलं. स्मृति मांधनाने 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. ज्यावेळी जिंकण्यासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी स्मृति मांधनाने सिक्स मारुन चाहत्याचं मनं जिंकलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now