जळगावात प्रतिकात्मक रूग्ण रस्त्यावर उतरले!

ऑक्टोबर 13, 2022 7:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । शहरातील बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौक दरम्यानचा रस्ता दुरूस्ती करावा, या मागणी बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मनसेच्या वतीने प्रतिकात्मक रूग्ण रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच येत्या आठ दिवसात रस्ता दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

jalgaon 2022 10 13T192007.113

या आंदोलन प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहराध्यक्ष अशीष सपकाळे, सचिव जितेंद्र करोसिया, सचिव दिलीप सुरवाडे, रज्जाक सय्यद,ललित शर्मा,विशाल सोनार,संदीप पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now