धक्कादायक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

ऑक्टोबर 2, 2022 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

eknath shinde 8 jpg webp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सर्वांसोबत मिसळणारा सर्वांसोबत राहणारा मुख्यमंत्री कोण? तर एकनाथ शिंदे. अशी प्रतिमा त्यांनी बनवली आहे. विविध ठिकाणी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागरिकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा ऍक्सेस एकदम सहज असतो. मात्र आत्ताच एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साध्या सध्या – सरळ वागणुकीकीमुळे त्यांना कोणीही कसेही भेटू शकत. अशावेळी याचा फायदा घेत आत्मघाती स्पोट घडवून आणून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. यामुळे गुप्तचर विभाग व पोलीस प्रशासन अजून सज्ज झालं आहे.महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now