दुई शिवारात अनोळखी बेवारस तरुणाचा आढळला मृतदेह, चोरटा असल्याचा संशय!

सप्टेंबर 23, 2022 12:42 PM

Muktainagar news – जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील दुई शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला असून दोन दिवसात मृतदेहाची ओळख पटली नाही. दरम्यान, मयत अनोळखी असल्याने चोरटा असल्याचा शेतकऱ्यांचा संशय बळावला आहे. तर पोलीसांपुढे मयताची ओळख पटविण्याचे आव्हान आहे.

crime 5 jpg webp

पोलीस पाटील गुलाब कोचुरे यांनी मुक्ताईनगर पोलिसांत दिलेल्या खबरीवरुन, दि २१ रोजी सकाळी तालुक्यातील दुई शिवारातील जावळे यांच्या शेती गट नं.२५ मध्ये बांधावर एक अनोळखी व्यक्ती मयत स्थितीत मिळून आला. मयताचे अंदाजे वय ४०-४५ वर्ष असुन, सावळा रंग,उंची अंदाजे पाच फुट पाच इंच,शरीराने मजबुत,लांबट चेहरा,अंगात तपकिरी अंडरपॅड व कमरेभोवती गुंढाळलेले पांढरे रंगाचे बनियान अशी वर्णन माहीती पोलीस सुत्रांकडुन प्राप्त झाली.

दरम्यान सदर मृतक कृषीपंपाच्या केबल चोरांच्या टोळीतीलच चोरटा असावा असा संशय परिसरातुन व्यक्त होत आहे. सुकळी -दुई परीसरात वारंवार केबल चोरीच्या घटना घडत असुन या घटनेच्या रात्रीही शेती-शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या केबल चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांत नोंद असुन मयताचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तपास पो.नि.शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.साहा.फौजदार ठाकुर,पो.हे.काॅ.विकास नायसे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories