Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव येथील बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स महाविद्यालच्या हिंदी विभागाच्या प्रमुख व पीएचडीच्या मार्गदर्शक प्रा. डॉ. सुनीता कावळे यांना यावर्षीचा ‘आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी’ हा राष्ट्रीय पुरस्कार कानपूर येथे विशेष सोहळ्यात देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
भारत उत्थान न्यास व कानपूर साहित्य मंच यांच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. न्यासचे केंद्रीय संरक्षक डॉ. उमेश पालीवाल, केंद्रीय अध्यक्ष सुजित कुंतल तसेच साहित्य मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष बरेन सरकार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. कावळे यांना यापूर्वीही पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ.सुनिता कावळे यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांचे वडील नारायणराव कावळे व आई अनुसया कावळे यांना दिले आहे.