इनरव्हील क्लब ऑफ रेलसिटी अध्यक्षपदी प्रतीक्षा पाटील

सप्टेंबर 19, 2022 3:03 PM

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा येथील प्रभाकर हॉलमध्ये झाला. यावेळी अध्यक्षपदाची सूत्रे पूर्व अध्यक्ष मोना भंगाळे यांच्याकडून प्रतीक्षा पाटील यांनी तर सचिव पदाची सूत्रे मीनाक्षी धांडे यांनी स्वीकारली.

jalgoan 3 1 jpg webp

प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, डॉ.रश्मी शर्मा, रजनी सावकारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने क्लब सर्व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष प्रतीक्षा पाटील म्हणाल्या की, समाजोपयोगी कार्यक्रम व महिलांसाठी आणि पर्यावरण उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतील. प्रमुख पाहुणे इतर सर्व सदस्यांचे तुळशी रोप देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रसंगी डॉ.मृणाल पाटील, किरण पोलडिया, डॉ.किर्ती चांदवडकर, आदिती भडंग, आरती पाटील, मोना भंगाळे, सीमा सोनार, सुनीता पाचपांडे, कविता पाचपांडे, पल्लवी वारके, विनीता नेवे, मीनाक्षी धांडे, नीता अहिरराव, कोमल पाटील, स्नेहांकिता जाधव, जागृती पाटील,रेवती मांडे, संगीता पाटील, कांचन चौधरी, काजल पाटील उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now