छायाचित्रकारांचा सोहळा : मैत्रीचा व क्षण आठवणीचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

सप्टेंबर 10, 2022 5:23 PM

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । सर्व फोटोग्राफर व व्हिडीओग्राफरांसाठी संजय खर्डे, योगेश शर्मा, दिगांबर जाधव व अभिनय नाईक यांच्या वतीने मैत्रीचा व क्षण आठवणीचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या रविवारी, ११ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान श्री. क्षेत्र भवानी मंदिर, चारठाणा, मुक्ताईनगर येथे होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवर फोटोग्राफी व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

rajendra 1 1

साधारण: गेल्या तीन वर्षांपासून सोहळा मैत्रीचा हा उपक्रम राबविला जात आहे. विशेष म्हणजे, चार मित्रांनी मिळून सुरू केलेला या कार्यक्रमाला पहिल्या वर्षी ४५० महाराष्ट्रतुन छायाचित्रकार बंधूं सहभागी झाले होते. दुसऱ्या वर्षी १ हजार ३५० पेक्षा जास्त आणि तिसऱ्या वर्षी २ हजार पेक्षा जास्त बंधू उपस्थित होते. महाराष्ट्र नव्हे तर काही बंधू बाहेरील राज्यातून देखील आले होते. यंदा पासून 4 मित्र नव्हे तर 11 मित्र, म्हणजे, संजय खर्चे, मलकापूर. योगेश शर्मा, मलकापूर.अभिनय नाईक,अंतुरली.डिगांबर जाधव (बापू), बुलढाणा. सुनील महाजन,ऐनपुर. मनोज पाटील, बुऱ्हाणपूर. अनिल पाटील,महालखेडा.रवि महाजन, रावेर. किरण पाटील, चांगदेव. विनोद चौधरी, कुऱ्हा काकोडा मिळून हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती देण्यात आली.

अतिथिती म्हणून यांची उपस्थिती
बैजू पाटील, औरंगाबाद. रामकृष्ण सुर्वे, नांदेड. के.गणेश, नागपूर. सचिन भोर,पुणे. रोशन ठाकुर, कळवण. सुनील जाधव,पुणे. कुशल सोनी, रायपूर. सुशिल भोसले, अंबेजोगाई. राम भाले, परळी.अनंत वाघ,बीड.सुनील बोर्डे, बुलढाणा. श्रीराम जाधव,इस्लामपूर. अभय काप्रे, पुणे. शरद पोखरकर,जुन्नर. अभिषेक शेलार, नगर. हे अतिथिती म्हणून उपस्थित असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories