मोठी बातमी : सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन!

सप्टेंबर 4, 2022 4:53 PM

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच रविवारी अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. पालघरच्या चारोटी येथे आमदाबाद मुंबई महामार्गावर त्यांचा अपघात झाला. ज्यात ते जागीच मृत पावले. पालघर पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सारस मिस्त्री हे गुजरात होऊन मुंबईकडे रवाना होत होते. यावेळी डिव्हायडरला गाडी आडळल्याने अपघात झाला.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”

सायरस मिस्त्री jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now