भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताच्या ‘या’ खेळाडूंवर आहे विजयाची जबाबदारी

सप्टेंबर 4, 2022 1:12 PM

Ind Vs Pak Live T20 jpg webp

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | दुबई येथे सुरू असलेल्या आशिया चषकातल्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर इतर संघांना हरवत भारत सुपर फोरमध्ये गेला आहे. मात्र सुपर फोर मध्ये गेल्यामुळे भारतीय खेळाडूंची जबाबदारी आता वाढली आहे. काहीही करा आणि एशिया कप जिंकाच असे आता भारतीय नागरिकांची इच्छा आहे. अशावेळी सुपरफोर मध्ये पहिलीच मॅच ही पाकिस्तान सोबत असल्याने भारतीय खेळाडूंना सतत चांगले प्रदर्शन करणे गरजेचे आहे.

रवींद्र जडेजा याला अचानक झालेल्या दुखावतीमुळे तो संघाच्या बाहेर आहे. यामुळे एक अष्टपैलू खेळाडू संघाच्या बाहेर गेला आहे. रवींद्र जडेजा केवळ भारतासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी करत नव्हता तो एक उत्कृष्ट फिल्डर देखील होता. अशावेळी त्याची उणीव भरून काढण्यासाठी संपूर्ण भारतीय संघाला चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा, उप कर्णधार लोकेश राहुल, विराट कोहली, याचबरोबर हार्दिक पांड्या यांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे तर भारतीय गोलंदाजांना देखील चांगला प्रभावी मारा करावा लागणार आहे. तरच पाकिस्तानवर विजय मिळवणे सोप्प होणार आहे. मात्र रवींद्र जडेजा याला झालेल्या दुखापतीमुळे त्याची जागा कोण भरून काढणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे कारण की खऱ्या अर्थाने अष्टपैलू असलेला रवींद्र जडेजा दुखापदृष्ट झाल्यामुळे भारतीय संघाचा टेन्शन वाढला आहे.

पाकिस्तानचा संघ जरी सध्या फॉर्मत नसला तरी भारताविरुद्ध पाकिस्तानचा संघ चांगलाच खेळतो आहे इतिहास आहे. अशावेळी पाकिस्तानला हरवण तितकच कठीण असणार आहे. त्यानंतर एशिया कप जिंकण हि कठीण असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now