⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | 5G चा उपभोग घेण्यासाठी नवीन फोन आणि सिम घ्यावे लागणार? वाचा सविस्तर..

5G चा उपभोग घेण्यासाठी नवीन फोन आणि सिम घ्यावे लागणार? वाचा सविस्तर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 5G In India । गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच ५जीची चर्चा सुरू आहे. या ५जी वरून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न सुद्धा आहेत. ५जी सेवेसाठी त्यांना नवीन सिमकार्ड आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करावे लागणार की जुन्या फोनमध्ये ही सेवा मिळेल. भारतात लवकरच 5G Service लाँच करण्यात येणार आहे. ऑक्टोबर पर्यंत देशातील प्रमुख शहरात 5G नेटवर्क कनेक्टिविटी मिळू शकेल. स्पेक्ट्रम लिलावानंतर लोकांना 5G सर्विच्या लाँचिंगची उत्सूकता आहे. जिओ ने सुद्धा आपल्या वार्षिक बैठकीत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दिवाळीपर्यंत ५जी सर्विस मिळू शकते, असे म्हटले आहे. एअरटेलने सुद्धा स्पष्ट केले आहे की, त्यांची सर्विस ऑक्टोबर मध्ये लाँच केली जावू शकते. वोडाफोन आयडियाची ५जी वरून ऑपरेटर्सपेक्षा वेगळा प्लान आहे. कंपनी यूजर्सची गरज पाहून 5G Service लाँच करणार आहे.
सर्विसवरून चर्चा करण्याआधी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, 5G काय आहे. ही टेलिकम्यूनिकेशनचे पुढचे जनरेशन आहे. ज्याला ५ वे जनरेशन किंवा पिढी म्हणून शकता. यात केवळ इंटरनेट स्पीड होत नाही तर ५जी नेटवर्कवर तुम्हाला कॉल आणि कनेक्टिविटी सुद्धा मिळणार आहे.

कोणत्या फोनमध्ये चालेल 5G?

जवळपास सर्वच ब्रँड्सने ५जी सपोर्टचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सर्विसचा लाभ तुम्हाला एक ४जी स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही. यासाठी तुम्हाला कमीत कमी ५जी स्मार्टफोन खरेदी करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला बँड्सचा विचार करावा लागेल.

नवा फोन खरेदी करणे आवश्यक आहे का?

याचे उत्तर तुमच्या फोनवर अवलंबून आहे. जर तुमच्याकडे एक ५जी फोन असेल तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावून ५जी सपोर्टला साइन चेक करू शकता. अनेक फोनमध्ये 4G/3G सोबत 5G चा ऑप्शन येत आहे. यासाठी तुम्हाला Setting> Connection> वर जावे लागेल. तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन नसेल तर तुम्हाला ५जी सपोर्टचा फोन खरेदी करावा लागेल.

नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागेल का?

नाही, ५जी सर्विससाठी तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे सध्याच्या सिम कार्डवर ५जी कनेक्शन सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. कंपन्या नवीन कार्ड खरेदीवर 5G SIM ऑफर करू शकतात.

किती रुपयाचा असेल प्लान?

टेलिकॉम कंपन्यांनी अजूनपर्यंत ५जी प्लान्सच्या किंमतीचा खुलासा केला नाही. जर तुम्हाला ४जीच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागणार की नाही, यासंबंधीची अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.

काय बदल होईल?

५जी नेटवर्क आल्यानंतर एका दिवसात काही बदल होणार नाही. परंतु, तुम्हाला जबरदस्त कॉल आणि कनेक्टिविटी मिळू शकते. याशिवाय, इंटरनेट स्पीड एका दिवसात जरूर बदलेल. ज्या ठिकाणी तुम्हाला 4G वर 100Mbps ची स्पीड मिळत असेल तर ५जी आल्यानंतर तुम्हाला आरामात 1Gbps ची स्पीड मिळेल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह