अभियंत्यांच्या घरावर छापेमारी ; नोटांचा ढीग पाहून अधिकाऱ्यांना फुटला घाम, पाहा VIDEO

ऑगस्ट 27, 2022 5:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । बिहारमध्ये एका सरकारी अभियंत्याच्या घरात कोट्यवधींचं घबाड सापडले आहे. यावेळी अधिकाऱ्यांना नोटा मोजेपर्यंत घाम निघाला मात्र त्या काही संपेना अशी अवस्था झाली होती.

raid bihar jpg webp

बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेले कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ज्यावेळी छापेमारी सुरु होती, त्यावेळी कार्यकारी अभियंता यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. संजय कुमार रॉय यांनी त्यांच्या सरकारी नोकरीच्या काळात अधिक गडगंज संपत्ती कमावली आहे. सध्या त्यांच्याकडे सापडलेल्या संपत्तीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळपासून अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापेमारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजून आणखी किती ठिकाणी त्यांची काळी मालमत्ता आहे. हे सुध्दा उघडकीस येण्याची शक्यता आहे. सकाळपासून त्यांच्या घरी तेरा अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. ज्यावेळी त्यांच्या घरी नोटा सापडल्या त्यावेळी अधिकारी सुध्दा चक्रावून गेले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now