स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

ऑगस्ट 24, 2026 5:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ येथिल रहीवासी रिद्धेश अनंत बेंडाळे यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची प्रतिष्ठेची संधी मिळाली.

anant bendale

या मानाच्या सोहळ्यात त्यांनी मा. केंद्रीय मंत्र्यांसोबत स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण अनुभवला. रिद्धेश अनंत बेंडाळे हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बालरोग विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत बेंडाळे आणि कान-नाक-घसा विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पंकजा बेंडाळे यांचे सुपुत्र आहेत. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा फडकताना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा मिळालेला हा बहुमान रिद्धेशच्या कुटुंबासाठी तसेच संपूर्ण गोदावरी परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.

शैक्षणिक क्षेत्रासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ही बाब निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे. रिद्धेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशात पालकांचे मार्गदर्शन मिळालेल्या संस्कारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मानले जात आहे. रिद्धेश यांनी भविष्यातही यशाची नवनवी शिखरे गाठावीत, आपल्या कुटुंबाचे तसेच संस्थेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करावे यासाठी गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा डॉ.उल्हास पाटील यांचेसह समाजातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now