मुक्ताईनगर पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील

ऑगस्ट 27, 2022 10:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष युवराज बगळे व सचिव म्हणून संदीप इंगळे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, पोलीस पाटलांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष यांनी विविध समस्या व मग्ण्यांविषयी चर्चा केली.

jalgoan 8 1

जिल्ह्याचे प्रभारी एस.पी चंद्रकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली डी.वाय.एस.पी सोनवणे, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पीआय शंकरराव शेळके, पी.एस.आय राहुल बोरकर, पी.एस.आय परवीन तडवी यांच्या उपस्थितबैठक पार पडली. यावेळी जिल्हा अध्यक्ष दीपक चौधरी, ज्येष्ठ पोलीस पाटील समाधान भोंबे व मूक्ताईनगर तालुक्यातील पोलीस पाटील, गणेश मंडळे, डि.जे. मालक उपस्थित होते.

तसेच कार्यकारी अध्यक्ष रुपेश कांडेलकर, सरचिटणीस धम्मरत्न भालेराव, सहसचिव मुंजीलाल पवार, जिल्हा मार्गदर्शक समाधान भोंबे, जिल्हा सदस्य तथा तालुका प्रसिध्दी प्रमुख अलका महाजन, जिल्हा सदस्य म्हणून अनिल वाघ व कैलास बेलदार यांनी देखील निवड करण्यात आली आहे.

सूत्रसंचालन मुक्ताईनगर तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक अ.फ.भालेराव सर यांनी केले. मुक्ताईनगर चे माजी पोलीस पाटील मोहन मेढे, पीआय शंकर शेळके डीवायएसपी सोनवणे व प्रभारी पो अधिक्षक यांनी आगामी येणाऱ्या सण व उत्सवांवर मार्गदर्शन करून माहिती दिली व समारोप व आभार पीआय शेळके यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now