जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्यालगत असलेल्या राज्य सीमा तपासणी चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणावर अवैध गैरव्यवहार व भष्ट्राचार होत असल्याचा गंभीर आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

प्रत्येक ट्रक चालकाकडुन दोन-दोन हजार रूपये नियमबाह्य घेतले जात असून दिवसाला दहा ते बारा लाख रुपयांची अवैध माया आटीओ गोळा करीत आहे. तसेच टन काट्यात अफरा तफर करुन अवैध प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शेजारील मध्य प्रदेशातील चेक पोस्टवरील वजनकाट्यात व महाराष्ट्रातील चेक पोस्टवरील वजन काट्यात दिड ते दोन टन वजनाची तफावत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशमधील चेक पोस्ट महाराष्ट्रामधील चेक पोस्ट व खाजगी काट्यावर वजन करुन बघितल्यास दोन टनापर्यत तफावत आढळुन आली. प्रत्येक ट्रकचालकांकडून दोन हजार रुपये नियमबाह्य घेतली जात आहेत. याबाबत जवळ -जवळ दहा ते बारा वाहनचालकांचे लाईव्ह विडीओ स्टेंटमेंट आमदार खडसे यांनी घेतले असून नियमबाह्य गैरव्यवहार याठिकाणी होत आहे, ट्रकमागे दोन-दोन हजार रुपये नियमबाह्य वसुल करुन दिवसाला बारा लाखापर्यत अवैध कमाई आरटिओ कडुन जमा केली जात आहे.

वजनात आढळुन आलेल्या तफावतीबाबत टनकाटे नादुरुस्त असल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु, मॅन्युअल पद्धतीने दिली जाणारी रिसीट बेकायदेशीर आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या गाईड लाईन नुसार कारवाई केली पाहीजेत. मात्र, तशी कारवाई होतांना दिसुन येत नाही, वरपासुन खालपर्यत साटेलोटे आहे. म्हणुन कोणीही कारवाई करायला तयार नाही. याबाबत आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्याचे ते म्हणाले.
तसेच या गैरप्रकाराबात अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचे तसेच याप्रकाराबाबतची माहीती, विडीओचा पेनड्राईव्ह मुख्यमंत्री यांचेकडे देणार असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले.राज्य सीमा तपासणी नाक्यावरील भष्ट्राचाराबाबत आ.खडसे यांनी ग़भीर आरोप केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असुन काय कारवाई होणार याकडे परीसरातील जनतेचे लक्ष लागुन आहे.












