एसटीचा पास काढताय तर सावधान; मोठे रॅकेट सक्रिय

ऑगस्ट 18, 2022 12:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यातील नागरिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटीने रोज प्रवास करतात. यासाठी ते पास देखील काढतात. अश्या वेळी या नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे. कारण बनावट पास बनवून त्याची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार धक्कादायक असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. (St Pass)

st bus

महत्वाची बाब अशी कि, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील एका दुकानातून शालेय विद्यार्थ्यांसाठी बनावट पास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नशिराबाद -बेळी मार्गावरील वरील बस वाहक हे विद्यार्थ्यांची पास तपासत असतांना बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता पास बाबत कोणतीही नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.

या संदर्भात संबंधीत विद्यार्थ्याची कसून चौकशी केली असता त्याने हा पास विकत घेतल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरातील एका दुकानातून हे बनावट पास तयार करून विद्यार्थ्यांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार वाहकाने जिल्हापेठ पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now