जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । सावदा येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव अत्यंत उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यात सावदा नगर पालिकेत मुख्यध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यात मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.
एन.सी.सी विद्यार्थ्यांनी ध्वजास सलामी दिली. यावेळी सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी नागरिक, कर्मचारी, आदी उपस्थीत होते. यावेळी आ.ग. हायस्कूल व ना.वि.ह. पाटील कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनिनी आझादी तसेच तिरंग्या विषयी जनजागृतीपर सुंदर पथनाट्य सादर केले. व उपस्थितीची मने जिंकली यावेळी लहान मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले.
यानंतर येथील संभाजी चौकात भारत माता पूजन करण्यात आले. यावेळी डॉ, व्ही,जे, वारके यांचे पूजन करण्यात आले. मुख्यधिकारी किशोर चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, हेमांगी चौधरी, ताराबाई वानखेडे, राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक अजय भारंबे, शाम अकोले सिद्धार्थ बडगे, माजी नगरसेविका सुभद्राबाई बडगे, लीना चौधरी, रंजना भारंबे, जयश्री नेहेते, मीनाक्षी कोल्हे, रेखा वानखेडे, नंदाबाई लोखंडे, करुणा पाटील, निलिमा बेंडाळे, नेहा गाजरे यांचे सह पदाधिकारी, व नागरिक उपस्थित होते.