जळगाव लाईव्ह न्यूज | Jio Phone 5G | सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. अशावेळी फोनमध्येही नवनवीन अविष्कार होतच असतात. सध्या संपूर्ण जगामध्ये 5G फोन ट्रेंड करत आहे. अशावेळी देशातील सर्वात मोठी कंपनी असलेले रिलायन्स जिओ लवकरच आपला सर्वात स्वस्त 5G फोन लाँच करणार आहे. म्हणजेच मार्केटमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. (Cheapest 5G फोन)
रिलायन्स जिओ आपल्या पहिला जिओ फोन 5G लवकरच उपलब्ध करून देणार आहे. 12 हजार रुपयांपर्यंत हा फोन असू शकतो असे म्हटले जात आहे. तर अजून एका रिपोर्टच्या नुसार हाच फोन अडीच हजार (२५००) रुपयाला देखील उपलब्ध होऊ शकतो. मात्र अडीच हजार की बारा हजार (१२०००) हे अजून नीट समजले नसल्याने याची खरी किंमत बाजारात आल्यावरच समजेल. (Jio Phone 5G)
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. यावेळी ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ संपली असून लवकरच भारतामध्ये पहिला 5G Phone येणार आहे. असे म्हटले जात आहे. Jio Phone 5G मध्ये 1:600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD+ IPS LCD डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 4G RAM आणि 32GB स्टोरेजसह Snapdragon 480 5G SoC असण्याची अपेक्षा आहे.
Jio Phone 5G मध्ये मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी समोर 8-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. Jio Phone 5G त्याच प्रगती OS वर चालणे अपेक्षित आहे, जे Jio कडून Android फोनसाठी Google च्या सहकार्याने विकसित केले गेलेले Android सॉफ्टवेअर आहे.