समाजसुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने महाविद्यालयात वृक्षारोपण

ऑगस्ट 2, 2022 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । यावल येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व जेष्ठ समाजसुधारक, प्रबोधनकार साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त प्रतिमांचे पूजन करून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

vrukshyaropan

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते वड, पिंपळ, निंब, चिंच, बकाम, सिसम आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधा खराटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. जी. भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, डॉ. पी. व्ही. पावरा, मिलिंद बोरघडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमेश्वर तायडे, शाहरुख तडवी, यतीन पाटील, सचिन बारी, सानिका सावकारे, पूजा पाटील, विजया पाटील, इंद्रायणी बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now