रोटरी राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी

जुलै 30, 2022 3:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । रोटरी डिस्ट्रिक्टकडुन बेस्ट क्लब म्हणुन गौरवांकीत झालेल्या रोटरी जळगांव राॅयल्सच्या अध्यक्षपदी विजय लाठी तर मानद सचिवपदी जितेंद्र भोजवानी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. आज शनिवार रोजी रोटरी भवन मायादेवी नगर येथे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे.

rotari jalgaon jpg webp

रोटरी इंटरनेशनल चे मेजर गिफ्ट एडवाइज़र माजी प्रांतपाल राजीव शर्मा तसेच सहाय्यक प्रांतपाल दिलीप गांधी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी नुतन संचालक व सभासदांची देखील घोषणा केली जाईल. विजय लाठी हे कापड व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्राशी देखिल निगडीत असुन रावसाहेब रूपचंद लाठी यांचे नातु आहेत. तर जितेंद्र भोजवानी आटोमोबाइल क्षेत्राशी निगडीत आहेत. दोन्ही नुतन पदाधिकारी गेल्या १० वर्षांपासुन रोटरीशी संलग्न असून सामजिक कार्यात सक्रिय आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now