मोहराळात वनविभागाची मोठी कारवाई, तीन लाखाचे सागवान लाकूड जप्त

जुलै 30, 2022 10:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । यावल तालुक्यात बेकायदेशीर सागवान लाकूडची कटींग करून विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर यावर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. यात तब्बल तीन लाख रूपये किंमतीचे सागवान लाकूड व साहित्या जप्त करण्यात आले आहेत.

jalgaon crime 1 1 jpg webp

यावल तालुक्यातील मोहराळा येथील अय्युब हसन तडवी यांच्या घरात ही कारवाई करण्यात आली. तडवी यांच्याकडे कुठलेही परवानगीचे पत्र नसताना बेकायद्याशीररित्या सागवान लाकूडची कटींग करून विक्री करत होते. यात सुमारे दोन घन मिटर सागवानचे कट साईज केलेले ५६ नग लाकडाच्या पाटया व सुमारे ४० हजार रुपये किमतीची कटाई मशीन व २० हजार रूपये किमती मोटर यंत्रणा असा एकुण तिन लाख रूपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वनविभागाचे धुळे विभागाचे वनसंरक्षक डी.पगार, जळगाव विभागाचे डीएफओ एच. एस. पद्दमाभन, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पुर्व आणी पाश्चिम तसेच गस्ती पथकाच्या कारवाई केली.

याप्रसंगी पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी. मिलावे, पाश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, बी.वाय.नलावडे, वनसंरक्षक प्रमिला मराठे, सरला भोंगरे, गस्ती पथकाचे आनंदा पाटील, हरिपुरा क्षेत्राचे वनपाल आर.बी. पाटील, आर. पी. तायडे, वाय.डी. तेली, पोलीस हवलदार सचिन तडवी, वनपाल विलास पाटील, वनपाल योगेस सोनवणे, ए.एम. तडवी, वाहनचालक ईमाम तडवी यांच्यासह यांनी संयुक्त कारवाई केली. वनसंरक्षक धुळे डी डब्ल्यु पगार , सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश शिंदे यांनी आपल्या सर्व अधिकारी व वन विभागातील सर्व कर्मचारी यांचे या कारवाई सहभागा बदल कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now