रत्नापिंप्री येथे विविध विकास कार्यकारी सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व

जुलै 26, 2022 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । रत्नापिंप्री विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रा.आर.व्ही.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १३ पैकी ९ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी संघटना चे उमेदवार विजयी झाले. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ सतीश भास्करराव पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

rastravadi

विजयी उमेदवार प्रा.आर. व्ही. पाटील, कैलास बिरारी, शांताराम पाटील, जगदीश मनोरे (बिनविरोध) समाधान पाटील, गणेश पाटील, नारायण पाटील, निर्मलाबाई पाटील, मीराबाई पाटील यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, माजी सरपंच भिकन पाटील, रमाकांत पाटील, माजी सरपंच डॉ. ज्ञानेश्वर लांडगे, सुयोग पाटील, गुलाब पाटील, डॉ. प्रवीण पाटील, भिकन पाटील, प्रकाश पाटील, उपसरपंच अंकुश भागवत, विश्वास पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now