
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । जळगाव सुंदरनगर, काशिनाथनगर, श्रावणनगर, पुरुषोत्तमनगर, द्वारकानगर, माधवनगर, सदाशिवनगर या परिसरातील रस्त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापौर जयश्री महाजन व शहर अभियंता यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्या मांडल्या. तसेच या नागरिकांनी या परिसरातील रस्त्यांबाबत महापौरांना निवेदन देखील दिले. परिसरात कॉलन्या वसल्या आहेत तेव्हापासून आजतागायत या परिसरात रस्तेच तयार करण्यात आले.

नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. महापौर महाजन यांनी समस्या ऐकून संबंधित अभिंयत्यांना योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले. तसेच या परिसरातील गटारी, घनकचरा संकलनाबाबत कार्यवाहीचेही आश्वासन दिले. या वेळी सुधाकर पाटील, नंदू पाटील, प्रदीप पाटील, विनायक महाजन उपस्थित होते.












